लोकप्रतिनिधी नव्हे हा तर धमकी बहाद्दर!

Foto
देसरडा यांच्या विरोधात तक्रारींचा ओघ
कंत्राटदाराची पाठराखण करून बोगस विकास कामे करायची आणि विरोध करणार्‍या वार्डातील नागरिकांनाच दमदाटी करायची, असा प्रशांत देसरडा यांचा खाक्या ! कालही त्यांनी सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणार्‍यांना धमक्या दिल्या, शिवीगाळ केली. यापूर्वीही सुराणा नगर वार्डातील असंख्य लोकांना देसरडा यांनी दमबाजी केल्याच्या तक्रारी आता येत आहेत.
चिस्तिया चौक ते एमजीएम या सिमेंट रस्त्याच्या कामावर प्रश्न उपस्थित करीत सोमवारी नागरिकांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे देसरडा यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. त्यांनी फोनाफोनी करून नागरिकांना दमबाजी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर एका पत्रकाराला शिवीगाळ करण्यापर्यंत देसरडा यांची मजल गेली. विशेष म्हणजे लोक रस्त्यावर उतरले असताना देसरडा ऑफिसमध्ये बसून कंत्राटदारासोबत वाटाघाटी करीत होता. या प्रकरणानंतर आता सुराना नगर वार्डातील शेकडो नागरिक पुढे आले आहेत. देसरडाचे कारनामे आम्ही उघड करणार, असा दावा या नागरिकांनी केला. एकदा एका निवृत्त अभियंत्याच्या घरासमोरील काम बोगस होत असल्याने त्यांनी ते रोखले. देसरडा यांना ही बाब समजताच त्यांनी ज्येष्ठ अभियंत्याला धमकी दिली. एका ज्येष्ठ नागरिकाला वयाचा विचार न करता देसरडा यांनी कशी शिवीगाळ केली याचे किस्सेही सुराणा नगरात ऐकायला मिळू लागले आहेत.
कंत्राटदार म्हणतो, आनंद घोडलेंशी बोला!
या कामात गैरप्रकार होत असल्याने संतप्त नागरिकांनी कंत्राटदार चव्हाण यांनाच फोनवर जाब विचारला. काल जवळपास 50 हून अधिक फोन कंत्राटदाराला गेले. अखेर कंटाळलेल्या कंत्राटदाराने तुम्ही आनंद घोडेले यांच्याशी बोला असाच सल्ला तक्रारदारांना दिला.
ते बोगस बांधकाम पाडा!
 दरम्यान वाय एस खेडकर हॉस्पिटलपासून सुरू झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. तसेच ड्रेनेजच्या कामामध्ये विटा ऐवजी पेव्हर ब्लॉक वापरून चेंबरचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम पाडा अशी मागणी आता नागरिक करीत आहेत. याबाबत स्थानिकांनी आमदार अतुल सावे यांच्याशी संपर्क साधून तक्रारी केल्या. आज आ. सावे या कामाच्या पाहणीसाठी येणार असल्याचे समजते.
देसरडा गायबच
 रस्त्याच्या बोगस बांधकामाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेले असताना या वार्डाच्या नगरसेविकेचे पती प्रशांत देसरडा तिकडे फिरकलेही नाहीत. नागरिकांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याबाबत तक्रारी केल्या. दुसरे नेते नागरिकांच्या समस्यांसाठी टाउन सेंटर परिसरात दाखल होत असताना देसरडा मात्र तिकडे फिरकलेही नाहीत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker